गोंदिया -सालेकसा तालुक्यातल्या कचारगड येथे राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ठिकाणाला भेट दिली. यावेळी त्यांच्याकडून कचारगड देवस्थानाला " अ " चा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेत आदिवासी लोकांचे पूर्वज राहत असल्याने कोया पूनम रात्रीपासून येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
गोंदियातील कचारगड देवस्थानाला पर्यटनाचा अ दर्जा - देवेंद्र फडणवीस
कचारगड येथे आशिया खंडतील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेत आदिवासी लोकांचे पुर्वज राहत असल्याने कोया पुनम रात्रीपासून येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
देशातील लाखो आदिवासी बांधवांचे कचारगड श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी कोयपूणम यात्रानिमित्त दरवर्षी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे सर्व भाविक आपल्या इष्ट देवतेचे दर्शन करण्याकरता डोंगर चढून दर्शन घेत असतात. या यात्रेनिमित्त या ठिकाणी राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन भरवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी या अधिवेशनाला भेट दिली. यावेळी अटल आरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले. आदिवासी बांधवासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. या भागातील विकासाला गती यावी याकरता या देवस्थानाला पर्यटनाचा " अ " दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. रखडलेले सिंचन प्रकल्प सोबतच या भागातील अन्य प्रश्न थेट दिल्लीतून सोडविण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
सालेकसा तालुका राज्यातील अतिदुर्गम आहे. या तालुका १०० टक्के नक्षलग्रस्त असून मुख्यामंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिल्याने आपल्या भागाचा विकास होणार, अशी आशा स्थानिक बाळगत असून यामुळे आदिवासी बांधव सुखावला आहे.