महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिलिंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी, गोंदिया जिल्ह्यातील घटना - 6 injured in cylinder blast

गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताळगाव येथील नीताराम वासुदेव पंधरे यांच्या घरी घडली आहे. यानंतर जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेले व्यक्ती
गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेले व्यक्ती

By

Published : Jul 16, 2021, 5:33 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताळगाव येथील नीताराम वासुदेव पंधरे यांच्या घरी घडली आहे. यानंतर जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, हे सर्व लोक मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय भंडारा येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, जखमी झालेल्यांमध्ये घरातील 6 लोकांचा समावेश आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे हे लोक जखमी झाले आहेत. तसेच, घरातील सामानाचे सुमारे 25000 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जखमी झालेल्यांमध्ये घरातील 6 लोकांचा समावेश

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील नीताराम वासुदेव पंधरे यांच्या घरी काल (15 जुलै)च्या रात्री आठ वाजेच्या दरम्यान गॅस सिलिंडर लिक झाल्याने स्फोट झाला. यामध्ये घरातील चारजण व एक शेजारी गंभीर जखमी झाला. कालच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास अन्न गरम करण्यासाठी गॅस पेटवला. त्यावेळी गॅसने अचानक पेट घेतला. त्यामध्ये नीताराम वासुदेव पंधरे, भागरता वासुदेव पंधरे, प्रकाश वासुदेव पंधरे, प्रभू पंधरे, रसिका पंधरे व शेजारी कवडू महागू बनारसी हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना प्रथम उपचरासाठी अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, सर्व जखमी व्यक्तींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details