महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या ४२२ शाळा आजपासून सुरू - राज्यातील शाळा आजपासून सुरू

गोंदिया जिल्ह्यात आज दुसऱ्या टप्प्यात वर्ग ५ वी ते ८ वी पर्यंतच्या ४२२ शाळा सुरु झाल्या असून ५०% विद्यार्थ्यांनी आज पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली आहे. या शाळेमध्ये शासकीय आणि खासगी शाळेचा देखील समावेश आहे.

Gondia district school start
Gondia district school start

By

Published : Jan 27, 2021, 3:37 PM IST

Updated : Jan 27, 2021, 3:49 PM IST

गोंदिया -जिल्ह्यात आज दुसऱ्या टप्प्यात वर्ग ५ वी ते ८ वी पर्यंतच्या ४२२ शाळा सुरु झाल्या असून ५०% विद्यार्थ्यांनी आज पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली आहे. या शाळेमध्ये शासकीय आणि खासगी शाळेचा देखील समावेश आहे.

गोंदियात पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू

तबल ११ महिन्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात ५ वी ते ८ वी चे शाळा सुरू झाल्या असून मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागताच राज्यातील सर्व खासगी तसेच शासकीय शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पहिल्या टप्यात वर्ग ९ ते १२ पर्यतच्या शाळा तसेच महाविद्यालय सुरु करण्यात आले होते. मात्र आज वर्ग ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू झाल्या असून गोंदिया जिल्यात पहिल्याच दिवशी ४२२ शाळा सुरु झाल्या असून आज ५० % विद्यार्थ्यांनीच शाळेत हजेरी लावली. तर तब्ब्ल १० महिन्यानंतर आज शाळेत जायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे या बाबी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या असून सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत.

Last Updated : Jan 27, 2021, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details