गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अवैधरित्या जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले. ट्रकमधून ४६ जनावरांची सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून देवरी पोलिसांनी ही कारवाई केली.
कत्तलखान्यात जाणाऱ्या दोन ट्रकमधून ४६ जनावरांची सुटका, २० लाखांचा माल जप्त हेही वाचा -संतापजनक! पायाचा आवाज केला म्हणून 38 विद्यार्थिनींना 200 उठाबशांची शिक्षा
छत्तीसगड राज्यातून देवरीमार्गे नागपुरकडे जाणाऱ्या दोन ट्रकमध्ये अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पितांबरटोला गेटवर नाकाबंदी केली होती. पोलिसांनी पाहताच ट्रक चालक (क्रमांक एमएच ३५/एजे १२४५) खुर्शीपार झेब्रा क्रॉसींगजवळ अंधाराचा फायदा घेत दाट जंगलात पळून गेला. यावेळी ट्रकमध्ये एक रेडा आणि १९ म्हशी आढळून आल्या. चार लाख किंमत असलेल्या या जनावरांसह ८ लाख किमतीचा ट्रक, असा एकुण १२ लाखांचा माल जप्त करण्यात आला.
हेही वाचा -'सरड्यालाही लाजवेल, इतक्या वेळा तुम्ही रंग बदलले आहेत'
तर जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणारा दुसरा ट्रक परसटोला नाका येथे पकडण्यात आला. चिचगडहून देवरीकडे जाणाऱ्या या ट्रकमध्ये (एमएच १८-एए ९७४७) २६ जनावरे आढळली. या जनावरांचा किंमत बाजारात जवळपास ७८ हजार रुपये आहे. या जनावरांसह ५ लाख किमतीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला. या दोन्ही ट्रकचालकांविरोधात कलम ११ (१) (ड), सहलम ५ (अ), ९, म.रा. प्राणी संरक्षण कायदा सन १९९५, सहकलम १५८/१७७, ३ (१) /१८१ मो. वा. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद इर्शाद अय्युब अन्सारी (रा. मयोधानगर, नागपूर) आणि मोहम्मद फैसल मो. अक्रम अंसारी (रा. यशोधानगर, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.