महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानांवर धाड; पोलीस आणि महसूल विभागाची कारवाई - सुंगधी तंबाखू देवरी

जिल्ह्यात छुप्या मार्गाने सुंगंधीत तंबाखूची विक्री केली जाते. या माहितीच्या आधारे पोलीस आणि महसूल विभागाने काही दुकानांवर छापा टाकला. यात ४ पोती गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

सुंगधी तंबाखू जप्त
सुंगधी तंबाखू जप्त

By

Published : Aug 17, 2020, 7:35 PM IST

गोंदिया - राज्यात गुटखा, पान मसाला तसेच तंबाखू पदार्थांवर बंदी असताना तंबाखुची मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीनी विक्री केली जाते. जिल्ह्यातील देवरी तालुका हा मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने अनेकदा या मार्गाने तस्करी केली जाते. अशाच एका गुप्त माहितीच्या आधारे देवरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांची कारवाई

देवरी परिसरात गुटखा आणि तंबाखूची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याची माहिती देवरी पोलिसांना मिळाला. ही माहिती मिळताच पोलिसांनी तहसीलदारांच्या मदतीने देवरी शहरातील किराणा दुकानाची तपासणी केली. यामध्ये विशाल किराणा दुकान आणि सुरेश किराणा दुकान, या दोन ठिकाणी सुगंधित तंबाखू आढळून आली आहे. दोन्ही दुकानात सुगंधित तंबाखू छुप्या पद्धतीने विकली जात असून तब्बल ४ पोती सुंगंधीत तंबाखू पोलीस आणि महसूल विभागाच्या धाडीत हस्तगत करण्यात आली आहेत. प्रकरणी महाराष्ट्र अमली पदार्थ कायद्या अंर्तगत देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -राज्यभरात मुसळधार; अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details