गोंदिया - सूर्याचा पारा मे महिन्यात वाढला असून नागरिकांसह वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे वन्य अधिकाऱ्यांनी प्राण्यांसाठी नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये दगडी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी वन्य प्राण्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
थंडा..थंडा..कूल..कूल! नवेगाव नागझिरा अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी उभारले ३२ दगडी पाणवठे
सध्या मे महिन्यात सूर्य आग ओकत असून पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा सुरु झाला की तलाव, नाले, यातील पाण्याची पातळी कमी होऊन ते कोरडे पडत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे सिमेंटचे पाणवठे तयार करण्यात आले होते. मात्र उष्णतेमुळे सिमेंटच्या पाणवठ्यातील पाणी गरम होत आहे. यामुळे ते गरम पाणी वन्यप्राणी पीत नव्हते. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्यात योग्य नियोजन करत दगडांनी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

वन्य अधिकाऱ्यांनी जंगलात खड्डे तयार करत त्या खड्यात प्लास्टिक, दगड, माती आणि रेती टाकत नैसर्गिक पद्धतीने ३२ पाणवठे तयार केले आहेत. प्रत्येक पाणवठ्याजवळ बोअर मारण्यात आले असून त्या ठिकाणी सोलर पम्पही बसवण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पाणवठ्यातील पाणी थंड राहते. त्यामुळे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी वन्यप्राणी येत आहेत. या वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.