गोंदिया- पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने दुचाकी वाहने चोरणाऱ्या आंतराज्यीय टोळीच्या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी वाहने तसेच पाच कम्प्युटर प्रिंटर जप्त करण्यात आले आहे. मागील काही दिवसात गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दुचाकी तसेच ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयातील संगणक चोरीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने शोध मोहीम सुरू केली आहे.
मोटारसायकल चोरीच्या आंतरराज्यीय टोळीतील ३ चोरांना अटक - गोंदिया पोलीस
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने दुचाकी वाहने चोरणाऱ्या आंतराज्यीय टोळीच्या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी वाहने तसेच पाच कॅम्पुटर प्रिंटर जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, गोंदिया गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात संगणक साहित्य चोरी करणारी तसेच गोंदिया जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी एकच आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणत चोऱ्या केल्या असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. याचा शोध घेत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील धमदीप मेश्राम या तरुणाला ताब्यात घेत विचारपूरस केली. त्याच्याकडून व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील दोन साथीदार, विकास शर्मा आणि फर्दिन शेख याच्या तिघांकडून पाच दुचाकी तसेच कॅम्पुटर प्रिंटर जप्त करण्यात आले आहे.