गोंदिया - जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरसह 2 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आणखी 3 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
गोंदियात डॉक्टरसह आणखी 2 जणांना कोरोनाची लागन, एकूण संख्या 195 वर
गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरसह 2 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आणखी 3 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.जिल्ह्यातील एकूण रुगणांची संख्या 195 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या मेडीकल आणि गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. अहवाल प्राप्त होताच मेडीकलमधील डॉक्टर, कर्मचारी आणि इतर रुग्णांमध्ये खळबळ उडाली आहे. हे डॉक्टर ज्या विभागात कार्यरत होते त्यांच्या संपर्कातील 20 जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
एकूण 3 कोरोनाबाधितांमध्ये एक मेडिकल डॉक्टर आणि दुसरे दोन रुग्ण हे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील आहेत. या दोन्ही रुग्ण बाहेरुन प्रवास करुन आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १९५ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १३० कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. तर सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.