गोंदिया - रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजप महिला मोर्चेच्यावतीने शक्ती सन्मान महोत्सवाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या पाठविल्या जाणार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातूनही २० हजारावर राख्या पाठविल्या जाणार आहेत. महिला भाजपच्या महिला घरोघरी जाऊन या राख्या जमा करत आहेत.
मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून २० हजारावर राख्या रवाना; भाजप महिला मोर्चाचा उपक्रम - रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट दरम्यान भाजप महिला मोर्चा व भाजप कार्यकर्ते समाजाच्या विविध घटकातील महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून या राख्या जमा करत आहेत. या राख्या १५ ऑगस्टला मुंबई येथे शक्ती सन्मान महोत्सवात मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट दरम्यान भाजप महिला मोर्चा व भाजप कार्यकर्ते समाजाच्या विविध घटकातील महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून या राख्या जमा करत आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभार्थी असणाऱ्या महिलांशी संपर्क साधण्यात येत आहे.
या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी राख्या पाठविण्यासोबत एका पत्रात मुख्यमंत्र्यांना आपले मनोगत तसेच एक संदेशही लिहिले आले. दरम्यान, १५ ऑगस्टला मुंबई येथे शक्ती सन्मान महोत्सवात या राख्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.