गोंदिया - 28 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन सालेकसा ( Salekasa police station Lady Police Commit Suicide ) येथे त्या कार्यरत होत्या. ज्योती बघेले यांनी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.
त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली -
ज्योती बघेले आणि त्यांचे पती रमेश गिरिया हे दोघेही सालेकसा येथे पोलीस विभागात कार्यरत आहेत. ज्योती सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये तर रमेश सी 60 पथकात कार्यरत आहेत. सकाळी दोघेही आपापल्या ड्युटीवर गेले होते. ज्योती बघेले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुन्हा आपल्या घरी आल्या. काही वेळानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या ( Lady Police Commit Suicide in Gondia ) केल्याचे पोलिसांनी सांगितले.