गोंदिया - मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील येगावच्या एका विवाहित महिलेने पती मुलींचा सांभाळ करत नसल्याच्या कारणाने चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाती भेंडारकर, असे आत्महत्या केलेल्या २७ वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पती मुलींचा सांभाळ करत नसल्याने, २७ वर्षीय महिलेची आत्महत्या - महिला
मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील येगावच्या एका विवाहित महिलेने पती मुलींचा सांभाळ करत नसल्याच्या कारणाने चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाती भेंडारकर, असे आत्महत्या केलेल्या २७ वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
येगाव येथील प्रमोद भेंडारकर यांच्यासोबत २०११ ला स्वातीचे लग्न झाले होते. या दाम्पत्याला २ मुली आहेत. काल सोमवारी रात्री प्रमोद सोबत स्वातीचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. तेव्हा तिने रागाच्या भरात राहत्या गळफास घेतला. घरातील मंडळीना तिचा मृतदेह घरातील ढाब्यावर आढळला. तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत आत्महत्या केलेल्या स्वातीने पती प्रमोद मुलींचा सांभाळ व्यवस्थित नसल्याने हे पाऊल उचलले असल्याचे लिहले आहे.
मात्र, स्वातीच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून प्रमोदच्या कुटुंबीयांनी मिळून स्वातीची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. स्वातीने चिठ्ठीत मुलींचा साभांळ त्यांच्या आजोबांनी करावे, असे सांगितले आहे. दरम्यान, पतीच्या जाचामुळे स्वातीने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.