गोदिया- जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे 26 नवे रुग्ण आढळले आहेत. गोंदियातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे.
चिंताजनक.. गोंदियात 24 तासात आढळले 26 कोरोनाबाधित रुग्ण, जिल्ह्याची संख्या २९ वर - गोंदिया कोरोना विषाणू अपडेट
गोंदियात 24 तासात 26 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या 29 वर गेली आहे. 1 रुग्ण कोरोनामुक्त झाला असून 28 जणांवर उपचार सुरु आहेत.
गोंदिया कोरोना अपडेट
29 पैकी 1 रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. 28 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. स्थलांतरीत लोकांमुळे जिल्हातील रुग्ण संख्या वाढली असल्याचे गोंदिया जिल्हा प्रशासनाने स्पष्ठ केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता रात्री 7 ते सकाळी 7 पर्यत्न कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
Last Updated : May 22, 2020, 2:03 PM IST