गोंदिया -देवरी तालुक्यातील ग्राम सावली येथे घराच्या छतावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२४ जून) सायंकाळी घडली. दीक्षा देवनाथ बिनझेलकर असे या मृत तरुणीचे नाव आहे.
गोंदियात घराच्या छतावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, एप्रिल महिन्यात झाला होता साखरपुडा - tumkheda
सोमवारी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास दीक्षा ही काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली होती. मात्र, तिचा तोल गेल्याने ती छतावरून खाली पडली.

घराच्या छतावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यु
सोमवारी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास दीक्षा ही काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली होती. मात्र, तिचा तोल गेल्याने ती छतावरून खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
गोंदियात घराच्या छतावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू
दीक्षा इंजिनियर असून ती नागपूरच्या एक खासगी कंपनीत कार्यरत होती. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील तरुणाशी झाला होता. या घटनेने सावली गावात शोककळा पसरली आहे.
Last Updated : Jun 25, 2019, 11:02 AM IST