महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजेच्या तारांजवळील शेतात 2 सारस मृतावस्थेत आढळले; विजेचा धक्क्याने मृत्यूचा अंदाज - undefined

गोंदिया जिल्ह्यातील एका भातशेतीमध्ये सारस क्रेनची जोडी मृतावस्थेत आढळून आली आहे. या पक्षांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कामठा गावातील भातशेतीतून जाणार्‍या विजेच्या ट्रान्समिशन लाइनखाली दोन क्रेनचे मृतदेह आढळून आले.

विजेच्या तारांजवळील शेतात 2 सारस मृतावस्थेत आढळले
विजेच्या तारांजवळील शेतात 2 सारस मृतावस्थेत आढळले

By

Published : Nov 23, 2022, 4:15 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील एका भातशेतीमध्ये सारस क्रेनची जोडी मृतावस्थेत आढळून आली आहे. या पक्षांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना कामठा गावातील भातशेतीतून जाणार्‍या विजेच्या ट्रान्समिशन लाइनखाली दोन क्रेनचे मृतदेह आढळून आले, असे सहायक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हे पक्षी वायरच्या संपर्कात आले असावेत आणि कोसळले असावेत. अधिकारी म्हणाले की त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. वन्यजीव तज्ञांच्या मते, सरस क्रेन हा जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. गोंदियात त्याची संख्या कमी होत आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (IUCN) रेड लिस्टमध्ये सारस ही असुरक्षित प्रजाती म्हणूनही नोंद झालेली आहे. या पक्षांनी गोंदियाला नवी ओळख दिली असून, त्यांना पाहण्यासाठी विदर्भासह अन्य ठिकाणचे लोक मोठ्या संख्येने येत होते.

मंगळवारी दोन पक्षांचे मृतदेह सापडल्यानंतर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या वरिष्ठ अभियंत्याला घटनास्थळी पाचारण करण्यात आले, असे वन अधिकाऱ्याने सांगितले. काही पक्षीमित्र कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी भेट दिली. मानद वन्यजीव वॉर्डन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था सस्टेनिंग एन्व्हायर्नमेंट अँड वाइल्डलाइफ असेंबलेजचे (SEWA) अध्यक्ष सावन बहेकर यांनी दावा केला की त्यांनी यावर्षी जुलैमध्ये वनविभागासोबत केलेल्या गणनेनुसार गोंदियामध्ये फक्त 34 सरस क्रेन आहेत. या समस्येचे मुळापासून प्रभावीपणे निराकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बेहेकर म्हणाले की, गोंदियातील या पक्ष्यांच्या मृत्यूची मुख्य कारणे विद्युत शॉक, विषबाधा आणि अधिवास नष्ट झाली आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details