गोंदिया- जिल्ह्यात काल कोरोना पॉझिटिव्ह असलेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण २१ मार्चला शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन आला होता. येथे तो २ तास उपस्थित असल्याची माहिती बँकेचे जिल्हा प्रबंधक यानी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण बँकेत निर्जंतुकीकरण करण्यात आले.
हा रुग्ण १७ मार्चला थायलंडवरून गोंदियाला आला होता. त्याचे विलगीकरण करण्यात आले होते. रुग्णाला त्याच्यासोबत विदेशातून आलेल्या छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील मित्राला कोरोना झाल्याचे कळाले होते. त्यानंतर रुग्णाने २६ मार्चला जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आपली तपासणी केली. या रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.