गोंदिया -जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता तसेच महिला बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सविता पुराम यांनी मुलींसाठी मोफत प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या मुलींना लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे गिरवता यावे, यासाठी त्यांनी १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. या प्रशिक्षणाला मुलींनी उत्तम प्रतिसाद दिला असून पालकांनी देखील त्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त तालुक्यातील मुलींना १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण... हेही वाचा... 'या' शहरातील मेट्रोत मिळणार मोफत वायफाय सुविधा
दिल्लीतील निर्भया या तरुणीवर झालेला अत्याचार असो, की हैदराबाद येथील डॉ. तरुणीवर झालेला अत्याचार अथवा गोंदिया जिल्ह्यात तरुणीवर झालेला अॅसिड हल्ला, या आणि अशा अनेक घटनांवर आळा घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महिलांना स्वरक्षणासाठी काही प्राथमिक धडे देणे तितकेच गरजेचे आहे. मुलींना जर लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे दिले तर अशा घटना कमी होतील, तसेच अशा प्रकारच्या अत्याचारापासून त्या स्वतःचा बचाव करू शकतात.
हेही वाचा... नववर्षदिनी जगात भारतात झाला सर्वाधिक बालकांचा जन्म