गोंदिया- नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी नक्षलवादी कारवाया सुरूच असतात. अशा वेळी या भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस विभागातील १३ अधिकारी, कर्मचाऱयांना पोलीस महासंचालकांचे सन्मान पदक जाहीर झाले आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ मे रोजी गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात हे पदक प्रदान केले जाणार आहे.
नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी, १३ पोलिसांना पोलीस महासंचालकांचे 'सन्मान पदक' - पोलीस महासंचालक
या अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ मे रोजी गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात हे पदक प्रदान केले जाणार आहे.
नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी, १३ पोलिसांना पोलीस महासंचालकांचे 'सन्मान पदक'
या पदकाचे गोंदिया जिल्ह्यातील १३ अधिकारी, कर्मचारी मानकरी ठरले आहेत. त्यात सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार नितीन तोमर, हवालदार किशोर कटारे, भगीरथ पुसाम, इंसाराम देव्हारी, इमरान काझी, परमानंद नंदागवळी, नायक पोलीस शिपाई रमेश माहुर्ले, देवेंद्र काटेंगे, जयेंद्र उकरे, विनोदकुमार कल्लो, संजय कटरे व मनिष तुरकर यांचा समावेश आहे.