गोंदिया -गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी विमानतळाकरिता १३ वर्षापूर्वी १०६ कुटुंबीयांनी ( 106 families compensation issue in Birshi ) जमीन आणि घरे विमान प्राधिकरणाला ( Aviation Authority for Birshi Airport ) दिली आहेत. त्यांचा योग्य मोबदला मिळेल या आशेने आपली जमीन व घरे येथील दिली होती. मात्र, १३ वर्षे लोटली तरी कुटुंबांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही.
संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर बिर्शी विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य गेटसमोर राखीव असलेल्या १६ एकर जमिनीवर ( Birshi Airport 16 acres of land ) अतिक्रमण केले आहे. बिर्शी गावातील १०६ कुटुंबियांना प्रत्येकी २५०० फूट जागेवर आज अतिक्रमण करत तिथे प्लॉटिंग करून घेतले आहे. तर मंगळवारपासून त्या जागेवर १०६ कुटूंबीय त्या जागेवर सामूहिक भूमिपूजन सोहळा करीत गृह निर्माणाला ( Bhumi Pujan at Birshi airport ) सुरुवात करणार आहेत.
२००५ पासून भूमी अधिग्रहणाला सुरुवात
गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी गावात ब्रिटिशकालीन विमानातळ होते. मात्र स्वातंत्र्यापूर्वी येथे असलेले विमानतळ नासधूस झाले होते. माजी केंद्रीय उद्यान मंत्री प्रफुल पटेल यांनी उद्यान मंत्र्यालयाची धुरा सांभाळतातच या बिर्शी गावात २००९ साली सूसूज विमानतळ तयार केला. यासाठी २००५ पासून भूमी अधिग्रहणाला सुरुवात झाली होती.