गडचिरोली Naxal Killed Youth Gadchiroli : एका 27 वर्षीय तरुणाची शुक्रवारी (24 नोव्हेंबर) रात्री अहेरी भागातील कपेवंचा येथे नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या (Youth Shot Dead by Maoist) केली. हा तरुण पोलिसांचा खबऱ्या होता आणि नक्षलवाद्यांच्या कारवाईबाबतची सर्व माहिती तो पोलिसांना देत होता, असा संशय नक्षलवाद्यांना होता. त्यातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) शनिवारी दिली.
गडचिरोली पोलिसांची माहिती : संबंधित तरुण हा पोलीस ख़बरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी त्याची निर्घूण हत्या केली आहे. मात्र, तो पोलिसांची खबरी नव्हता, असे स्पष्टीकरण गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलंय. तसेच परिसरात नक्षलविरोधी कारवाया सुरू आहेत. त्याबाबतही पोलीस कडक कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या : नक्षलवाद्यांनी एका निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या केली आहे. रामजी चिन्ना आत्राम असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कापेवंचाजवळ नक्षलवाद्यांनी रामजी आत्रामची गोळ्या घालून हत्या केली आहे. गेल्या दहा दिवसात नक्षलवाद्यांकडून नागरिकांच्या हत्येची गडचिरोलीतील ही तिसरी घटना आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली होती गडचिरोलीला भेट :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि अतिदुर्गम गडचिरोलीतील शा पिपली बुर्गी येथे पोलीस जवान तसेच ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावेळी आदिवासी महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण देखील केलं होतं. या भेटीनंतर लगेचच गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली होती. दिनेश पुसू गावडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप करत नक्षलवाद्यांनी 15 नोव्हेंबरला त्याची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
हेही वाचा -
- Dantewada Naxalite Attack Video: दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर, 10 जवान झाले शहीद
- छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातही नक्षली हिंसा, आयईडी स्फोटात एक जवान शहीद