गडचिरोली - भरधाव वेगात असलेल्या चाकी वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार तर दिल्लीतील रहिवासी असलेली तरूणी गंभीर जखमी झाली. ही घटना कुरखेडा-मालेवाडा मार्गावर कटंगटोला गावाजवळील वळणावर शनिवारी सकाळी घडली. हरिदास पदा (35, रा. खुटगाव ता. धानोरा) असे मृताचे नाव असून पुष्पलता भारद्वाज (30, रा. दिल्ली) असे जखमी युवतीचे नाव आहे.
गडचिरोलीत चारचाकी-दुचाकीचा अपघात; तरुण जागीच ठार तर दिल्लीची तरुणी गंभीर जखमी - गडचिरोली दुचाकी अपघात बातमी
कटंगटोला गावाजवळ असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक (सीजी 08 ऐएम 8394) या गाडीने मोटरसायकलला जबर धडक दिली. यामध्ये मोटरसायकल चालक जागीच ठार झाला तर एक युवती गंभीररित्या जखमी झाली. जखमी युवतीवर येथील कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सूत्रांकूडन मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली येथील एका एनजीओमध्ये कार्यरत असलेली पुष्पलता भारद्वाज व धानोरा येथील हरिदास पदा हे दोघेजण कुरखेडा येथे 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' संस्थेत रात्री मुक्कामी होते. आज सकाळी न्याहारपायली येथील काम आटोपून कोरची तालुक्यातील काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या मुलाखती घेण्यासाठी जात होते.
यावेळी कटंगटोला गावाजवळ असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक (सीजी 08 ऐएम 8394) या गाडीने मोटरसायकलला जबर धडक दिली. यामध्ये मोटरसायकल चालक जागीच ठार झाला तर एक युवती गंभीररित्या जखमी झाली. जखमी युवतीवर येथील कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.