गडचिरोली- विसापूर येथील एक युवक मंगळवारी वैनगंगा नदीत बुडाला. नदी पात्रात सैर करत असताना नाव उलटल्याने ही घटना घडली. सचिन ईश्वर रामटेके (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे.
वैनगंगा नदीत बुडून युवकाचा मृत्यू; ४ जण बचावले - Wainganga river youth death Visapur
विसापूर येथील नागरिक काल दुपारी निर्मला यादव म्हशाखेत्री या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी वैनगंगा नदीघाटावर गेले होते. तेव्हा मौज म्हणून पाच युवक नावेत बसले. नदीपात्रात पाणी भरपूर होते. सैर करीत असताना नाव उलटल्याने सचिन रामटेके, दिनेश मेश्राम, गौरव मसराम, दीपक उंदिरवाडे, मोरेश्वर कांबळे हे पाच युवक नदीत बुडाले.
![वैनगंगा नदीत बुडून युवकाचा मृत्यू; ४ जण बचावले सचिन ईश्वर रामटेके](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9346487-thumbnail-3x2-op.jpg)
विसापूर येथील नागरिक काल दुपारी निर्मला यादव म्हशाखेत्री या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी वैनगंगा नदीघाटावर गेले होते. तेव्हा मौज म्हणून पाच युवक नावेत बसले. नदीपात्रात पाणी भरपूर होते. सैर करीत असताना नाव उलटल्याने सचिन रामटेके, दिनेश मेश्राम, गौरव मसराम, दीपक उंदिरवाडे, मोरेश्वर कांबळे हे पाच युवक नदीत बुडाले. तेथे उपस्थित विकास चौधरी या युवकाने दिनेश मेश्राम, गौरव मसराम, दीपक उंदिरवाडे व मोरेश्वर कांबळे या चार युवकांचे प्राण वाचवले. मात्र, सचिन रामटेकेचा बुडून मृत्यू झाला. संध्याकाळपर्यंत सचिनचा मृतदेह सापडला नव्हता. गडचिरोली पोलीस घटनेचा तपास करीत आहे.
हेही वाचा-अल्पवयीन प्रेमीयुगुलाची वैनगंगेत उडी; दोघेही बेपत्ता