महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्याला अग्रेसर करणार; पालकमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास - पालकमंत्री गडचिरोली भेट

पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी आत्मसमर्पित नक्षल कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे
पालकमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jan 21, 2020, 7:07 PM IST

गडचिरोली - राज्याचे नगर विकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी गडचिरोलीला भेट दिली. पालकमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच भेट होती. त्यांनी आत्मसमर्पित नक्षल कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.


मागील वर्षात गडचिरोलीत 34 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारीमुळे तरुण नक्षवादाकडे वळत आहे. त्यामुळे नक्षलवाद संपवण्यासाठी राज्यसरकार उद्योग वाढीवर भर देणार आहे. जिल्ह्यातील सिंचन वाढ आणि उद्योग वाढ हे सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी औषधी वनस्पतींच्या उत्पादनावर विशेष भर देण्यात येणार आहे. शिक्षणाची दारे खुली करून युवकांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याची माहिती पालकमंत्री शिंदे यांनी दिली.

पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याला भेट

हेही वाचा - अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री

गडचिरोलीत बदली झाल्यानंतर कामासाठी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले. नक्षलवादाला समर्थन देणाऱ्यांची सरकार गय करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details