महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् धो-धो पावसातही मतदार डोक्यावर खुर्ची घेऊन ऐकत होते भाषण - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

अहेरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अमरीश आत्राम यांच्या प्रचारार्थ एटापल्ली येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सभा शनिवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, पावसाची दाट शक्यता असल्याने मुनगंटीवार आले नाहीत. त्यामुळे अमरीश आत्राम यांनी सभा घेतली.

...अन् धो-धो पावसातही मतदार डोक्यावर खुर्ची घेऊन ऐकत होते भाषण

By

Published : Oct 12, 2019, 7:46 PM IST

Updated : Oct 12, 2019, 9:11 PM IST

गडचिरोली - सध्या प्रचाराचा जोर वाढला असून अनेक मोठ्या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत. सभेला गर्दी जमावी यासाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. मात्र, स्वयंस्फूर्तीने सभेला गर्दी केलेले मतदार धो-धो पाऊस बरसत असतानाही डोक्यावर खुर्ची घेऊन जागेवरून हलले नाही. एटापल्ली येथे शनिवारी हा प्रकार पाहायला मिळाला.

...अन् धो-धो पावसातही मतदार डोक्यावर खुर्ची घेऊन ऐकत होते भाषण

अहेरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अमरीश आत्राम यांच्या प्रचारार्थ एटापल्ली येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सभा शनिवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, आकाशात ढग दाटून आले. त्यामुळे पावसाची दाट शक्यता होती. वातावरण खराब असल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी हेलिकॉप्टरद्वारे एटापल्लीच्या सभेला येणे रद्द केले. मात्र, उमेदवार अमरीश आत्राम यांनी ही सभा घेतली.

सभा सुरू असतानाच धो-धो पाऊस झाला. त्यामुळे सभेला गर्दी केलेले मतदार उठून जातील, असे वाटत होते. मंडपात मोठ्या प्रमाणात पाणी गळत असतानाही पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी उपस्थितांनी चक्क डोक्यावर खुर्च्या घेत शांतपणे भाषण ऐकले. यावेळी मतदारांचा प्रतिसाद बघता अमरीश आत्राम डोक्यावर पावसाचे पाणी गळत असतानाही उत्साहाने भाषण देत होते. सभेतील हा प्रकार पाहून अनेकांनी कौतुक केले.

Last Updated : Oct 12, 2019, 9:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details