गडचिरोली - नातेवाईकांसोबत मासेमारीसाठी नदीवर गेलेल्या दोन युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना १६ मे ला दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्यातील प्राणहिता नदीच्या महागाव घाटावर घडली. रोशन दीपक आलाम (१८), सानिया तुकाराम नैताम (१२) दोघेही रा. महागाव (खुर्द) अशी मृतकांची नावे आहेत.
गडचिरोली : मासेमारी करताना पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू - two died by drowning in pranhita river
अहेरी तालुक्यातील प्राणहिता नदीच्या पात्रात शनिवारी सकाळच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेल्या दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रोशन आलाम व सानिया नैताम हे शनिवारी सकाळच्या सुमारास प्राणहिता नदीपात्रातील महागाव घाटावर नातेवाईकांसोबत मासे पकडण्यासाठी गेले होते. दरम्यान नातेवाईक हे नदीपात्राच्या दुसऱ्या बाजुला मासे पकडत होते. त्यामुळे रोशन व सानिया या दोघांनी छोट्या नावेमध्ये बसून नातेवाईकांकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघांचाही तोल जाऊन नाव उलटली आणि खोल पाण्यात बुडून त्या दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून पाण्याबाहेर काढले. दोघांच्याही अकाली मृत्यूमुळे आलाम व नैताम परिवारावर दु:खाचे संकट कोसळले असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.