गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. प्रा. पद्माकर तानबाजी मडावी (42, रा.कोरेगाव चोप) आणि संजय मारोती उके (40, रा. कुरुड) अशी मृतांची नावे आहेत.
अंघोळीचा मोह जीवावर बेतला, वैनगंगा नदीत दोघांना जलसमाधी - वैनगंगा
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आज बुधवारी सकाळी त्यांचे मृतदेह तरंगताना दिसले.
प्रा. मडावी हे ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालय निलज (ता.ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) येथे कार्यरत होते. सध्या सीमाबंदीमुळे हे दोन मित्र मंगळवारी संध्याकाळी नावेद्वारे वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यातील खडकाळा घाटावर पोहोचले. तेथे नावाड्याला आम्ही अंघोळ करतो असे सांगून दोघेही मित्रा पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.
आज बुधवारी सकाळी त्यांचे मृतदेह तरंगताना दिसले. त्यांची दुचाकी नदीच्या गडचिरोली जिल्हयातील तीरावर होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.