गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात सावरगाव लगतच्या मोरचुल जंगलात गुरुवारी सकाळी गडचिरोली पोलीस दलाच्या सी सिक्स्टी कमांडोचे नक्षल अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रतिउत्तर दिले. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन नक्षल्याना ठार मारण्यात आले. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. अजुनही या भागात जवानांचे अभियान सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार - गडचिरोली पोलीस बातमी
गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. अजुनही या भागात जवानांचे अभियान सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस मुख्यालयातून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून हेलिकॉप्टरच्या साह्याने मृतदेह पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. मृत नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
अधिक वृत्त थोड्याच वेळात..