गडचिरोली -जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यातील तीन महिला आज कोरोनामुक्त झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आकडेवारी ४९ वर गेली. तर आज नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १४ सक्रिय कोरोनाबाधित रूग्ण आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात तीन महिला कोरोनामुक्त तर, नवीन दोघांची भर - गडचिरोली कोरोना रूग्ण
मूलचेरा तालुक्यातील तीन महिला आज कोरोनामुक्त झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आकडेवारी ४९ वर गेली. तर आज नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १४ सक्रिय कोरोनाबाधित रूग्ण आहेत.
दरम्यान, शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश काढले असून या आदेशानुसार जिल्ह्यात 25 जूनपासून सलून, ब्युटी पार्लरचे दुकान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सलूनमध्ये केवळ केस कर्तनास परवानगी राहणार असून दाढी करण्यास प्रतिबंध राहणार आहे. या आदेशामुळे नाभिक समाजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रिपोर्ट
▪️ एकूण पॉझिटिव्ह रूग्ण - ६४
▪️ आजचे पॉझिटिव्ह रूग्ण - ०२
▪️ बरे झालेले रूग्ण - ४९
▪️ एकूण मृत्यू - ०१
▪️ अॅक्टीव्ह असलेले रूग्ण - १४
▪️ संशयित रूग्ण - ५ हजार ८२२
▪️ दवाखान्यात दाखल संशयित रूग्ण - १४
▪ संस्थात्मक विलगीकरणात असलेले - १ हजार २०
▪️ आज तपासणीसाठी घेतलेले नमुने - १२९
▪️ आत्तापर्यंत एकूण नमुने तपासणी - ६ हजार २३७
▪️ दुबार तपासणीसाठी घेतलेले नमुने - ४१५
▪️ ट्रुनॅट वरील नमुने - २३१
▪️ आत्तापर्यंत निगेटीव्ह आलेले नमुने - ५ हजार ७१२
▪️ तपासणी अहवाल येणे बाकी - १२७
▪️ जिल्ह्यातील सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र - ०८
जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधित व कोरोनामुक्त संख्या
(आकडेवारी क्रम – एकूण बाधित रूग्ण-बरे झालेले रूग्ण-अॅक्टीव्ह रूग्ण)
१) गडचिरोली – ९-८-१
२) आरमोरी – ४-३-१
३) वडसा – ६-०-६
४) कुरखेडा – १०-९-१
५) कोरची – १-१-०
६) धानोरा – ४-३-१
७) चामोर्शी – ७-४-३
८) मूलचेरा –७-७-०
९) अहेरी – ४-३-१
१०) सिरोंचा –१-०-०(१ मृत्यू)
११) एटापल्ली – ८-८-०
१२) भामरागड –३-३-०
एकुण जिल्हा – ६४-४९-१४(१ मृत्यू)