महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू - pramod dahale

कुरखेडा तालुक्यातील आंधळी फाट्याजवळ असलेल्या शेतात मोटार पंप दुरुस्तीसाठी  विहिरीत उतरलेल्या मजूर आणि शेतमालकाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज (11ऑगस्ट) सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. प्रमोद डहाळे (वय ४०) आणि अजय मच्छीरके (वय २५) अशी मृतांची नावे आहेत.

मोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू

By

Published : Aug 11, 2019, 10:04 PM IST

गडचिरोली - कुरखेडा तालुक्यातील आंधळी फाट्याजवळ असलेल्या शेतात मोटार पंप दुरूस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या मजूर आणि शेतमालकाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज (11ऑगस्ट) सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. प्रमोद डहाळे (वय ४०) आणि अजय मच्छीरके (वय २५) अशी मृतांची नावे आहेत.

मोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू

प्रमोद डहाळे यांचे आंधळी फाट्यावर शेत आहे. सांयकाळी शेतातील विहीरीत मोटार पंपाच्या फूटबॉलमध्ये बिघाड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मजूर अजय मच्छीरके याला विहीरीत उतरवले. तो पाण्यात बूडत असल्याचे लक्षात येताच डहाळे स्वत:ही विहीरीत उतरले. मात्र मदत मिळण्यापूर्वीच तेसुद्धा पाण्यात बुडाले. दोघांचाही मृत्यु विहीरीतील विषारी वायूमूळे गूदमरून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी घटणास्थळावरून जवळच असलेल्या एका अन्य विहीरीत सुद्धा एका शेतमजूराचा विषारी वायूमुळे गूदमरून मृत्यु झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details