गडचिरोली- आल्लापल्लीपासून ७ किलोमीटर अंतरावरील तानबोडी फाट्याजवळ ट्रक आणि टिप्परचा भीषण अपघात झाला. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार्तिक धवणे (वय.२९ रा.चंद्रपूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून या अपघातात मृत्यू झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप कळू शकले नाही.
गडचिरोलीत टिप्पर-ऑटोचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - auto- tippar accident gadchiroli
आज दुपारी २ च्या सुमारास चंद्रपूरहून एक ऑटो शीतपेय घेऊन आल्लापल्लीच्या दिशेने जात होता. तर, आल्लापल्लीहून एक टिप्पर चंद्रपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, तानबोडी फाट्याजवळ या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. अपघात इतका जबर होता की, टिप्परच्या धडकेत ऑटोचा अक्षरश: चेदामेंदा झाला.
आज दुपारी २ च्या सुमारास चंद्रपूरहून एक ऑटो शीतपेय घेऊन आल्लापल्लीच्या दिशेने जात होता. तर, आल्लापल्लीहून एक टिप्पर चंद्रपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, तानबोडी फाट्याजवळ या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. अपघात इतका जबर होता की टिप्परच्या धडकेत ऑटोचा अक्षरश: चेदामेंदा झाला. या अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचे स्वीय सहायक अजय धवणे यांचे पुतणे कार्तिक धवणे (वय.२९) याचा देखील समावेश आहे. तर, दुसऱ्या मृताचे नाव अद्याप कळू शकले नाही. मृताच्या शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आणण्यात आले आहे.
हेही वाचा-गडचिरोलीत गारपिटीसह अवकाळी पाऊस; अंगावर झाड कोसळल्याने महिला ठार