गडचिरोली - जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी टाटा सुमो गाडीने जात असलेले प्रवाशी पुराच्या पाण्यात पुलावर अडकले. पुराच्या पाण्यात अडकल्याने बारा जणांना पोलीस व महसूल विभागाने करून सुखरूप बाहेर काढले. पुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख दहा मार्ग सद्यस्थितीत बंद असून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या 'सर्च शोधग्राम' प्रकल्पालाही पाण्याने वेढले आहे.
गडचिरोलीत 12 जणांना बचाव पथकाने पुरातून सुखरूप काढले बाहेर
मंगळवारी सकाळी टाटा सुमो गाडीने जात असलेले प्रवाशी पुराच्या पाण्यात पुलावर अडकले. पुराच्या पाण्यात अडकल्याने बारा जणांना पोलीस व महसूल विभागाने करून सुखरूप बाहेर काढले.
गेल्या चोवीस तासात एकट्या गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 126 मिमी पाऊस झाला. गडचिरोली शहरालगतची कठाणी व पोटफोडी नदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे दोन्ही नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथे नाल्याच्या पाण्यात 12 प्रवासी असलेली टाटा सुमो गाडी पुराच्या पाण्यात पुलावर अडकली. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने येथे जिल्हा आपत्ती निवारण दलाचे पथक तत्काळ दाखल झाले. दोन महिला व 8 पुरुषांसह बारा जणांना स्थानिक पोलीस व महसूल विभागाच्या प्रयत्नाने सुखरुप बाहेर काढण्यात आले.