महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी युवक जगताहेत स्वावलंबी जीवन - Gadchiroli Police initiative

पोलीस दलाचा रोजगार मेळावा ॲपवर 5 हजार आदिवासी युवक-युवतींनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या युवक-युवतींना गडचिरोली पोलीस दल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोबाइल आणि हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आली.

Gadchiroli Police initiative
Gadchiroli Police initiative

By

Published : Mar 17, 2021, 4:37 PM IST

Updated : Mar 17, 2021, 5:17 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. पोलीस दलाने तयार केलेल्या रोजगार मेळावा अ‌ॅपच्या माध्यमातून अनेक आदिवासी युवक-युवती स्वावलंबी जीवन जगत आहेत.

'रोजगार मेळावा ॲप' ठरतोय दुवा

पोलीस दलाचा रोजगार मेळावा ॲपवर 5 हजार आदिवासी युवक-युवतींनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या युवक-युवतींना गडचिरोली पोलीस दल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोबाइल आणि हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आली. 1 फेब्रुवारी रोजी सर्व युवक-युवतींना नियुक्तीपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले.

72 उमेदवार हॉटेल मॅनेजमेंट तर 23 जणांना ऑटोमोबाइल्स कंपनीत नोकरी

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव यांच्यामार्फत हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 72 युवक-युवतींना मुलाखतीद्वारे निवड करून मुंबई, गोवा, महाबळेश्वर, पुणे, नागपूर, लोणावळा अशा ठिकाणी 7 हजार ते 10 हजार रुपये वेतन, निवास व जेवणाची मोफत सोय अशी नोकरी मिळाली आहे. तसेच ऑटोमोबाइल्स प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 23 युवकांना कर्नाटक, अहमदनगर, पुणे, मुंबई या ठिकाणी 12 हजार रुपये मासिक वेतनावर नोकरी मिळाली आहे. आतापर्यंत 1 हजार 474 युवक-युवतींना रोजगार-आतापर्यंत जवळपास 1 हजार 474 युवक-युवतींना गडचिरोली पोलीस दलातर्फे रोजगार मिळाला आहे. रोजगार मिळालेल्या सर्व युवक युवतींचे गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे.

Last Updated : Mar 17, 2021, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details