महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 20, 2021, 9:17 AM IST

ETV Bharat / state

गडचिरोलीमध्ये दोन आदिवासी विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण; डॉ.प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सत्कार

गडचिरोलीमधील दोन आदिवासी विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डॉ.प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी त्यांचा सत्कार केला.

clear neet exam
गडचिरोलीमध्ये दोन आदिवासी विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण; डॉ.प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सत्कार

गडचिरोली - जिल्ह्यातील सुरज पुंगाटी आणि विजय ओक्सा हे आदिवासी विध्यार्थ्यी नीट परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. लोकबिरादरी प्रकल्प येथे स्व.लक्ष्मीबाई आमटे ट्रस्टच्यावतीने सुरज पुंगाटी आणि विजय ओक्सा यांचा जेष्ट समाज सेवक डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते प्रत्येकी 11 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

पुंगाटी हा लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील माजी विद्यार्थी व विजय ओक्सा हा भामरागड येथील मॉडल स्कुलचा विद्यार्थी आहे. हे अशिक्षित आदिवासी असुनही प्रचंड मेहनतीने व चिकाटीने नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. लवकरच या दोन्ही विध्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश मिळेल व ते डॉक्टर होऊन समाजाची सेवा करतील, असे आमटे म्हणाले. तसेच त्यांनी पुढील शिक्षणासाठी दोघांना शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details