महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीतील अतिदुर्गम गावात रंगल्या आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा - आदिवासी क्रीडा स्पर्धा

गडचिरोलीमधील कचकल या अतिदुर्गम गावात आदिवासी युवक युवतींसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सर्चच्या संचालिका डॉक्टर राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले.

आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा
आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा

By

Published : Jan 15, 2020, 5:22 PM IST

गडचिरोली -धानोरा तालुक्यातील कचकल या अतिदुर्गम गावात आदिवासी युवक युवतींसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये २७ गावांतील १३९ संघ सहभागी झाले होते. डॉक्टर के व्ही. चारी यांच्या स्मृतीनिमित्त सर्च(सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अॅण्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) संस्थेच्या जीवन शिक्षण विभागाद्वाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

अतिदुर्गम गावात रंगल्या आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा

हेही वाचा -गडचिरोलीच्या 'एंजल'ला सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सर्चच्या संचालिका डॉक्टर राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांच्या गटात कबड्डीचे ४८ आणि व्हॉलीबॉलचे ४६ संघ सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेदरम्यान ‘धावा आपल्या आरोग्यासाठी’ या उपक्रमातंर्गत 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये ९० युवक युवतींनी सहभाग घेत निरोगी आयुष्यासाठी धावणे आवश्यक असल्याचा संदेश दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details