महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 6, 2021, 7:55 PM IST

ETV Bharat / state

गडचिरोली : जिल्ह्यात 104 कोरोनामुक्त तर 44 नवीन कोरोना बाधित

आज 44 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

गडचिरोली कोरोना न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यात 104 कोरोनामुक्त तर 44 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली - जिल्ह्यात आज 44 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 29 हजार 640 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28 हजार 420 वर पोहचली. तसेच सद्या 493 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 727 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.


आज रविवारी 2 नवीन मृत्यू

यामध्ये रा. मार्कंडा हेटी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, तर रा. वेलगुर ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 80 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यामूळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.88 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.66 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.


44 नवीन रुग्णांची भर

नवीन 44 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 11, अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 09, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 02, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 06, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 04 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 02 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 104 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 21, अहेरी 04, आरमोरी 05, भामरागड 09, चामोर्शी 22, धानोरा 00, एटापल्ली 01, मुलचेरा 10, सिरोंचा 11, कोरची 02, कुरखेडा 04 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details