महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तेलंगाणा-महाराष्ट्र सीमेवर तेलंगाणा पोलिसांचा चोख बंदोबस्त; वाहनांची कसून चौकशी - gadchiroli corona news

गडचिरोली जिल्ह्यात झपाट्याने कोविड संक्रमण वाढत आहे. इतर राज्यातील नागरीकांनी विनाकारण तेलंगणात प्रवेश करू नये, म्हणून तेलंगणा सीमेवर पोलीसांचा फोजफाट तैनात करण्यात आला आहे.

पोलीस बंदोबस्त
पोलीस बंदोबस्त

By

Published : Apr 26, 2021, 4:18 PM IST

गडचिरोली- आज २६ एप्रिलला नक्षलवाद्यांनी भारत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर भुपालपल्ली जिल्ह्यातील कलेश्वरम पोलीस स्टेशन हद्दीतील तेलंगाणा- महराष्ट्र सीमेवर तेलंगाणा पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिणामी छत्तीसगढ, महाराष्ट्रतून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवर चोख बंदोबस्त -
एकीकडे नक्षलवाद्यांनी पुकारलेला नक्षल बंद, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात झपाट्याने कोविड संक्रमण वाढत आहे. इतर राज्यातील नागरीकांनी विनाकारण तेलंगणात प्रवेश करू नये, म्हणून तेलंगणा सीमेवर पोलीसांचा फोजफाट तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details