गडचिरोली-सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदी पुलालगत शनिवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली. या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे कळलेली नसली तरी तिघेही सिरोंचा येथील रहिवासी असल्यीच माहिती समोर येत आहे.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू - गडचिरोली अपघात बातमी
सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदी पुलालगत दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू
सिरोंचा येथील युवक दुचाकीने तेलंगणामध्ये जाण्यासाठी निघाले. तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील तीघांचा जागीच मृत्यू झाला. दुसर्या दुचाकीवरील दोन युवकही गंभीर जखमी झाले. ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे सिरोंचा शहरात शोककळा पसरली आहे.