महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : मल्लमपोडुर ग्रामपंचायतीने लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा - हिंदेवाडाटोला मिशन वनराई बंधारे

जिल्ह्यात 'मिशन वनराई बंधारे' मोहिमेअंतर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबवला जात आहे. त्या अनुषंगाने गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आणि भामरागड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंधारा बांधण्यात आला. यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल.

मल्लमपोडुर ग्रामपंचायतीने लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा

By

Published : Oct 28, 2019, 3:04 PM IST

गडचिरोली - मल्लमपोडुर ग्रामपंचायतीकडून नव घोषित पेसा ग्रामसभा मौजे हिंदेवाडाटोला येथे लोक सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

मल्लमपोडुर ग्रामपंचायतीने लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा

हेही वाचा -गडचिरोलीत 'बुलेट वर बॅलेट'चा विजय; पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या घातपाताविना पार पडली निवडणूक

जिल्ह्यात 'मिशन वनराई बंधारे' मोहिमेअंतर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबवला जात आहे. त्या अनुषंगाने गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आणि भामरागड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंधारा बांधण्यात आला. यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. यावेळी, सरपंच अरुणा वेलादी, ग्राम पंचायत सचिव अविनाश गोरे, समन्वयक ओमप्रकाश निखुरे, ग्रमसभा अध्यक्ष विकास मडावी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details