महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यावरण किती महत्त्वाचे आहे हे कोरोना महामारीने जगाला दाखवुन दिले -डॉ. कुणाल सोनवणे - tree plantinmg gadchiroli

भामरागड हद्दीतील नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणे करीता, पोस्टे भामरागड येथे काल दिनांक ०५ /०६ /२०२१ रोजी वृक्षारोपन कार्यक्रम घेतला. भामरागड परिसरात विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले.

भामरागड वृक्षारोपन कार्यक्रम
भामरागड वृक्षारोपन कार्यक्रम

By

Published : Jun 6, 2021, 11:45 AM IST

गडचिरोली-कोरोना या संसर्गजन्य विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यामुळे मानवजातीला प्राणवायुचा तुटवडा होत असल्याने, निसर्गाचे अनन्य साधारण महत्व जगभरात लक्षात आले आहे. पर्यावरणाशी संबधित विविध विषय, घटक आणि समस्याकडे लक्ष वेधुन घेण्याची गरज निर्माण झाल्याने एक माणुस एक झाड लावुन पुढील पिढीसाठी आक्सिजन किती महत्त्वाचे आहे, हे कोरोनाने दाखविले आहे.असे मत भामरगड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केले.

भामरागड वृक्षारोपन कार्यक्रम

भामरागड वृक्षारोपन कार्यक्रम

भामरागड हद्दीतील नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणे करीता, पोस्टे भामरागड येथे काल दिनांक ०५ /०६ /२०२१ रोजी वृक्षारोपन कार्यक्रम घेतला. पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल, सिआरपीएफ ३७ बटालीयनचे कमांडो मोहनदास खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात भामरगड उपविभागातील कोठी, ताडगाव, धोडराज, लाहेरी, नारगुंडा पोलीस मदत केंद्रात वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले. यावेळी पोस्टे भामरागड परिसरात विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले.

सहाय्यक कमाडंर यांनी व्यक्त केले मत
मानव जीवन कितीही प्रगत झाले, तरी ते निसर्गावर अवलंबुन आहे. निसर्गाचे संवर्धन हे आपले संवर्धन आहे तरी प्रत्येक नागरीकांनी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य आहे. असे मत नितीश रामपाल सहाय्यक कमाडंट ३७ बटालीयन यांनी सदरवेळी व्यक्त केले.

हेही वाचा- वृक्ष संवर्धनातून वातावरणातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार

ABOUT THE AUTHOR

...view details