महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलातर्फे मिळाले हक्काचे घरकुल - Surrendered Naxalites news

या रोजगार मार्गदर्शन मेळाव्याला जिल्ह्यातील ३२० आत्मसमर्पित युवक-युवती उपस्थित होते. यावेळी त्यांना हक्काचे घरकुल आणि जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Naxalites
Naxalites

By

Published : Feb 16, 2021, 10:06 PM IST

Updated : Feb 16, 2021, 10:14 PM IST

गडचिरोली - जिल्हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असून येथील आदिवासी नक्षल आत्मसमर्पित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने 'आत्मसमर्पित नक्षल युवक-युवतींना' मार्गदर्शन मेळावा आज मंगळवारी आत्मसमर्पितांच्या नवजीवन वसाहत नवेगाव येथे आयोजित केला होता. या रोजगार मार्गदर्शन मेळाव्याला जिल्ह्यातील ३२० आत्मसमर्पित युवक-युवती उपस्थित होते. यावेळी त्यांना हक्काचे घरकुल आणि जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Naxalites

८१ आत्मसमर्पित सदस्यांना जात प्रमाणपत्र वाटप

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची उपस्थिती होती. यावेळी आत्मसमर्पितांना वाटप झालेल्या भुखंडावर घरकुलाचे बांधकाम पुर्ण झालेल्या घरांचे उद्घाटन करुन, त्यांना घरकुल प्रमाणपत्र व ८१ आत्मसमर्पित सदस्यांना जात प्रमाणपत्र वाटप केले. कार्यक्रमात उपस्थित आत्मसमर्पितांना मार्गदर्शन करताना सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आपण सर्व नक्षलच्या जहाल व हिंसक विचारसरणीचा त्याग करून जे सुखी जीवन जगण्याचा निर्धार केला आहे, ते स्तुत्य आहे. आमचे कार्यालय आत्मसमर्पितांचे जात प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करेन. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आत्मसमर्पितांच्या बचत गटांना विशेष प्राधान्य देऊन ज्या ज्या योजनांचा लाभ देता येईल, त्याचा पाठपुरावा करून त्या आपणापर्यंत पोहोचवण्याचा सदैव प्रयत्न राहिल, असे सांगितले.

'शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणार'

सीईओमुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लोकशाही मार्गाने एक समिती तयार केली जाईल. त्यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस दल व आत्मसमर्पितांमधील काही व्यक्तीचा सहभाग असेल. या समितीमार्फत दर महिन्याला विकासकामांचा आढावा घेतला जाईल. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासनाच्या ज्या काही योजना आहेत, त्या मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Last Updated : Feb 16, 2021, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details