12 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण - gadchiroli naxlite news
कोलु पदा हा सप्टेंबर 2010 रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. नोव्हेंबर 2011 ते सन 2017 पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचे सुरक्षा गार्ड म्हणुन कार्यरत होता. त्यानंतर माहे- जुलै 2017 ते डिसेंबर 2021 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता. कोलु पदा याचेवर 03 खून, 07 चकमक, 01 दरोडा असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी 03 अॅम्बुश लावले होते.
गडचिरोली - 12 लाख रुपये बक्षीस असलेले कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा (वय 27 वर्ष रा. वक्कुर, पोस्टे कोयलीबेडा), (ता. आरेच्छा जि. नारायणपूर (छ.ग.) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी (वय 30 वर्ष रा. जवेली (बु.) ता. एटापल्ली जि. गडचिरोली) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
11 गुन्हे दाखल - कोलु पदा हा सप्टेंबर 2010 रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. नोव्हेंबर 2011 ते सन 2017 पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचे सुरक्षा गार्ड म्हणुन कार्यरत होता. त्यानंतर माहे- जुलै 2017 ते डिसेंबर 2021 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता. कोलु पदा याचेवर 03 खून, 07 चकमक, 01 दरोडा असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी 03 अॅम्बुश लावले होते. छत्तीसगडमधील अवालवरसे, महाराष्ट्रामधील मौजा झारेवाडा, पोयारकोठी, अॅम्बुशमध्ये व ओडीसामधील मौजा गुंडापूरी, कंजेनझरी, चुरामेट्टा या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. त्याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये सन- 2020 रोजी गडचिरोली जिल्ह्रातील कोठी पोलीस मदत केंद्र हद्दीतील पोयारकोठी जंगल परिसरात 1 पोलीस अधिकारी व 01 पोलीस जवान शहीद झाले होते.
अॅम्बुश लावण्यात हातखंड - राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी ही फेब्राुवारी 2011 मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती. सप्टेंबर 2012 ते माहे डिसेंबर 2021 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्रातील पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील पोयारकोठी जंगल परिसरात लावलेल्या अॅम्बुशमध्ये 1 पोलीस अधिकारी व 01 पोलीस जवान शहीद झाले. राजे उसेंडी हीचेवर 01 खून, 04 चकमक, 01 जाळपोळ असे एकुण 06 गुन्हे दाखल आहेत. सन- 2019 रोजी मौजा मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे या व्यक्तीच्या खुनात तिचा सहभाग होता.
शांततेचा मार्ग स्विकारावा - महाराष्ट्र शासनाने कोलु पदा याचेवर 8 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. तर राजे उसेंडी हिचेवर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.