महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या - gadchiroli police driver suicide

गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी (ऑपरेशन) ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकार (४७) यांनी कर्तव्यावर असताना स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.

gadchiroli police
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या

By

Published : Jul 7, 2020, 1:11 PM IST

गडचिरोली - जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी (ऑपरेशन) ढोले यांचे वाहनचालक मदन गौरकार (४७) यांनी कर्तव्यावर असताना स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मदन गौरकार हे मंगळवारी सकाळी कर्तव्यावर असताना उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले यांच्या निवासस्थानी होते. तेथे सुरक्षेसाठी तैनात गार्डच्या मोर्चामध्ये जाऊन कुणीही नसताना सुरक्षा गार्डची रायफल घेऊन स्वतःवर गोळी झाडली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. गौरकार हे १९९२ मध्ये गडचिरोली पोलीस दलात रूजू झाले होते. गडचिरोली शहर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details