महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात दिली ऑनलाईन परीक्षा - वायफाय इंटरनेट

भामरागडमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीला पोलीस धावून आले. पोलीस ठाण्यामध्ये बसवून जनरेटरच्या सहाय्याने वायफाय उपलब्ध करुन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सोय पोलीस विभागाने केली आहे. पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर सोडवता आले.

पोलीस ठाण्यात ऑनलाईन पेपर
पोलीस ठाण्यात ऑनलाईन पेपर

By

Published : May 13, 2021, 3:39 PM IST

गडचिरोली -कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचे ठरविले आहे. मात्र भामरागड तालुक्यातील खेड्यांमध्ये विद्यार्थ्यांना नेटवर्कची समस्या आहे. वीज पुरवठाही वारंवार खंडीत होतो. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांच्या मदतीला पोलीस धावून आले आहे. पोलीस ठाण्यामध्ये बसवून जनरेटरच्या सहाय्याने वायफाय उपलब्ध करुन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सोय पोलीस विभागाने केली आहे. पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर सोडवता आले.

विद्यार्थ्यांनी मानले पोलिसांचे आभार

मरमल्ली गावातील उमेश तोर्रेम यांचा एम. ए. द्वितीय वर्षाचा इतिहासाचा पेपर होता. तसेच जुव्वी येथील राजेश पुंगाटी यांचा बी.ए. द्वितीय अर्थशास्त्राच्या पेपर बुधवारी (दि.12) सकाळी 9 वाजता ऑनलाईन मोबाईलद्वारे परीक्षा द्यायची होती. अशातच भामरागड येथील वीज पुरवठा खंडीत होऊन इंटरनेट सेवा बंद झाल्याने दोन्ही विध्यार्थी परीक्षा कशी द्यायची, या विवंचनेत सापडले होते. दोन्ही विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन भामरागड पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये वायफाय उपलब्ध करुन दिल्याने सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षा देता आली. परीक्षा देता यावी यासाठी भामरागडचे ठाणेदार किरण रासकर, पो.उप.नि.मंगेश कराडे, पो.उप.नि.ज्ञानेश्वर बोसले, पो.उप.नि.संघमित्रा बांबोडे, पोलीस अमलदार संदीप गव्हारे गणेश मडावी यांच्या सहकार्याने आम्हाला परीक्षा देता आली. शहरामध्ये कोणी इतर कार्यालयात आतमध्येही प्रवेश करण्यासाठी चकरा मारावे लागते, आम्ही स्वतः अनुभवले मात्र भामरागड पोलीस ठाण्यात जाऊन अडचणी सांगितल्याबरोबर ठाणेदार रसकर यांनी तात्काळ व्यवस्था करुन दिली. यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलीसांचे अभार मानले आहे.

हेही वाचा -'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले

हेही वाचा -राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती

ABOUT THE AUTHOR

...view details