महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी बांधिलकी राखून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - गोंडवाना विद्यापीठ नववा दीक्षांत समारंभ

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मूलतः मोठी उद्यमशीलता असून तिला अनुरुप वाव देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. निसर्गाच्या कुशीतील या विद्यापीठावरील जबाबदारी मोठी आहे, असे मत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केले.

bhagatsingh koshyari
गोंडवाना विद्यापीठा

By

Published : Oct 12, 2021, 5:38 PM IST

गडचिरोली - गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होऊ शकेल. हे सूत्र लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून भविष्यात प्रयत्न केल्यास गडचिरोलीसह परिसराचा निश्चितच विकास होऊ शकेल अशी आशा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केली. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनील देशपांडे आणि मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली.

गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत

गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते होते. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचीही उपस्थिती होती. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनिल देशपांडे यांच्यासह मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली. स्व.सुनिल देशपांडे यांच्या वतीने श्रीमती निरुपमा देशपांडे यांनी ही पदवी स्विकारली.

गोंडवाना विद्यापीठ दीक्षांत समारंभा

लोकल ते ग्लोबल
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मूलतः मोठी उद्यमशीलता असून तिला अनुरुप वाव देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. निसर्गाच्या कुशीतील या विद्यापीठावरील जबाबदारी मोठी आहे. लोकल ते ग्लोबल या सुत्रानुसार येथील विद्यार्थ्यांनी गावाच्या विकासासोबतच देश आणि जगाच्याही कल्याणाचा विचार करावा. समर्पित भावनेने अविरत प्रयत्न केल्यास आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन तरुणांनी आत्मनिर्भर व्हावे. स्टार्टअपसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून उद्यमशीलता जोपासावी. आपल्या परिसराच्या सर्वंकष परिवर्तनासाठी निष्ठेने प्रयत्न करावेत. राज्यातील शहरी भाग आणि आदिवासी दुर्गम भाग यात मोठे अंतर आहे. ते भरुन काढण्यासाठी येथील विकासासाठी शिक्षित पिढीने स्वावलंबनावर भर देण्याची गरजही असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
या समारंभात विज्ञान व तंत्रविज्ञान शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा, मानव विज्ञान शाखा, आणि आंतरविज्ञान शाखेतील सुवर्ण पदक प्राप्त, प्रथम गुणवत्ता प्राप्त, आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र आरेकर यांनी केले तर गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी आभार मानले.
हेही वाचा -दोन दिवसात राज्यातील महाविद्यालय सुरू होण्याबाबत निर्णय - उदय सामंत

ABOUT THE AUTHOR

...view details