गडचिरोली - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून राज्य परिवहनच्या बसेस बंद आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत 50 टक्के वाहतूक सुरू असली, तरीही पूर्वी दिवसाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या गडचिरोली बस आगाराचे उत्पन्न सध्या 80 हजारांवर घसरले आहे. या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचा पगाराचा खर्चही भागवता येत नसल्याने बस आगाराच्या तब्बल 215 कर्मचाऱ्यांना वीस दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
10 लाखांचे उत्पन्न घसरले 80 हजारांवर...गडचिरोली एसटी आगाराचे 215 कर्मचारी सक्तीच्या रजेवर! - गडचिरोली एसटी आगार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून राज्य परिवहनच्या बसेस बंद आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत 50 टक्के वाहतूक सुरू असली, तरीही पूर्वी दिवसाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या गडचिरोली बस आगाराचे उत्पन्न सध्या 80 हजारांवर घसरले आहे.
10 लाखांचे उत्पन्न घसरले 80 हजारांवर...गडचिरोली एसटी आगाराचे 215 कर्मचारी सक्तीच्या रजेवर!
सध्याची स्थिती बघता पुढील काही दिवस पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. काटकसर करून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती गडचिरोली एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.