महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अखेर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात गडचिरोलीत धावू लागली लालपरी

लॉकडाऊनचा परिणाम देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला. राज्य परिवहन मंडळाची बस सेवा ठप्प झाली. याचा सर्वाधिक फटका गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्याला बसला. सध्या गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे तिसऱ्या लॉकडाऊनच्या प्रारंभी ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना कोरोना नियम पाळून एसटी सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

ST Bus
राज्य परिवहन मंडळ बस

By

Published : May 5, 2020, 8:30 AM IST

गडचिरोली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1 महिन्यापेक्षा जास्त काळ बंद असलेली 'लालपरी' अखेर सोमवारपासून धावू लागली. गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये असून तिसऱ्या लॉकडाऊनच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली.

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. याचा परिणाम देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला. राज्य परिवहन मंडळाची बस सेवा ठप्प झाली. याचा सर्वाधिक फटका गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्याला बसला. सध्या गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे तिसऱ्या लॉकडाऊनच्या प्रारंभी ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना कोरोना नियम पाळून एसटी सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार एसटीच्या गडचिरोली विभागाने नियोजन करत आपली सेवा प्रारंभ केली आहे.

मंगेश पांडे, आगार व्यवस्थापक, गडचिरोली

प्रत्येक एसटी बसमध्ये अर्ध्या संख्येत प्रवासी बसवण्याचे निश्चित झाले आहे. एसटी सेवा प्रारंभ झाल्याचा फायदा तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातून येऊन महाराष्ट्र सीमेवर अडकून पडलेल्या मिरची तोडणी कामगारांना झाला. गडचिरोलीच्या विभागीय नियंत्रकांनी एकूण 10 एसटी गाड्या चंद्रपूर जिल्ह्यातील पोडसा आंतरराज्य सीमेवर पाठवल्या. त्या ठिकाणाहून शेकडो मजूर गडचिरोली आणि त्यानंतर आपापल्या गावी एसटीद्वारे रवाना झाले. यापुढच्या काळातही एसटी सेवा जिल्ह्याच्या अंतर्गत सीमांमध्ये सुरळीतपणे सुरू राहणार आहे. सध्या प्रवासी भार असलेल्या गाव व शहरांना प्राधान्य दिले जाणार असून कोरोना पसरू नये यासाठीची सर्व काळजी घेऊन एसटी सेवा चालवली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details