गडचिरोलीयेथील गोंडवाना विद्यापीठात १७ व्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबरला विद्यापीठाचे कुलपती तथा महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी दिली. या महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ.कल्याणकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने इंद्रधनुष्य २०१९ च्या आयोजनाची जबाबदारी राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाकडे सोपवली आहे. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यातील २० विद्यापीठांमधील तरुणाई आपल्या कलेचे आविष्कार सादर करणार आहेत. त्यामध्ये संगीत, नाटक, साहित्य, नृत्य आणि ललित कला या पाच प्रकारांतील २६ कलांचा समावेश आहे. त्यासाठी ४० जणांचा चमू १ डिसेंबरला गडचिरोलीत दाखल होणार आहे.
हेही वाचारायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय