गडचिरोली - मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रामध्ये कर्तव्यावर असलेला पोलीस जवान चक्कर येऊन खाली पडला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. रामदास शिवदास धुळगुंडे (३३) असे मृत पोलीस जवानाचे नाव आहे.
गडचिरोलीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस जवानाचा चक्कर आल्याने मृत्यू
गडचिरोलीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस जवानाचा चक्कर आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
धुळगुंडे हा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेन्डू येथील रहिवासी आहे. तो गडचिरोली पोलिसांच्या राज्य राखीव पोलीस दल क्रमांक १४ मध्ये कार्यरत होता. गुरुवारी बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रामध्ये कर्तव्य बजावत असताना त्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे तो खाली कोसळला. त्याला पोलीस जवानांनी उचलले असता, त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
ही घटना माहित होताच जवानांचे परभणी येथील कुटुंबीय गुरुवारी रात्रीच गडचिरोलीकडे रवाना झाले. कर्तव्यावर असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नक्षल सेलचे अप्पर पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.