गडचिरोली - शुक्रवारी जिल्ह्यातील आणखी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. या सहाही व्यक्तींना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये एटापल्ली तालुक्यातील ४ रुग्ण व भामरागड-मुलचेरा येथील एक-एक रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्हावासियांसह प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहेत.
समाधानकारक! गडचिरोलीत आणखी ६ जण कोरोनामुक्त - गडचिरोली कोरोना अपडेट्स
शुक्रवारी जिल्ह्यातील आणखी सहाजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या २५ झाली आहे. तर, सध्या १४ कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यातील आणखी सहाजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या २५ झाली आहे. तर, सध्या १४ कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी एकाचा १ जूनला हैदराबाद येथे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे उपस्थित होते. यावेळी टाळ्यांच्या गजरात रुग्णांना रुग्णवाहिकेत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आले.