गडचिरोली - भाजपचे वर्चस्व असताना एका नगरसेविकेने बंडखोरी केल्याने जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा कुरखेडा नगरपंचायतीवर शिवसेनेने मुसंडी मारली. शिवसेनेच्या सुनीता बोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर, मूलचेरा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे विकास नैताम यांची निवड झाली.
गडचिरोली : कुरखेडा, मूलचेरा नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता - Sunita Borkar President Kurkheda Nagar Panchayat
भाजपचे वर्चस्व असताना एका नगरसेविकेने बंडखोरी केल्याने जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा कुरखेडा नगरपंचायतीवर शिवसेनेने मुसंडी मारली. शिवसेनेच्या सुनीता बोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर, मूलचेरा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे विकास नैताम यांची निवड झाली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना नेते किरण पांडव यांच्या प्रयत्नांमुळे हे यश आले आहे. कुरखेडा येथे सत्ता स्थापन करताना भाजपच्या बंडखोर नगरसेविका जयश्री रासकर मतदानासाठी येत असताना राडा झाला. त्यामुळे, शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांत धक्काबुक्कीही झाली होती. अखेर शिवसेनेच्या सुनीता बोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. मूलचेरा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे विकास नैताम यांची निवड तर, अत्यंत चुरशीच्या अहेरी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना - आदिवासी विद्यार्थी संघटना सत्तेत आले. आविसं च्या रोजा करपेत अध्यक्ष तर, शिवसेनेचे शैलेश पटवर्धन उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
हेही वाचा -किराणा दुकानात वाईन विक्री म्हणजे मुले आणि महिलांना दारूच्या आहारी नेण्याचा प्रकार - डॉ. अभय बंग