महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेततळ्याच्या पाण्यात बुडून चुलत भावांचा मृत्यू ; बोदली गावातील घटना - died

अचानक मुन्नाचे संतुलन बिघडल्याने तो पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. मुन्नाला वाचविण्यासाठी किसनने खड्ड्यात उडी मारली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

शेततळ्याच्या पाण्यात बुडून चुलत भावांचा मृत्यू

By

Published : May 18, 2019, 7:21 PM IST

गडचिरोली- विट भट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या २ चुलत भावांचा शेत तळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी गडचिरोली तालुक्यातील बोदली येथे घडली. मुन्ना मनोहर मेश्राम (वय १३) आणि किसन जगदिश मेश्राम (वय १३) दोघेही राहणार बोदली अशी मृत झालेल्या भावांची नावे आहेत.

शेततळ्याच्या पाण्यात बुडून चुलत भावांचा मृत्यू

मुन्ना आणि किसन हे चुलत भाऊ सकाळी सायकलने गावाजवळील विटभट्टीवर राख आणण्यासाठी गेले होते. राख जमा केल्यानंतर दोघेही सायकलने गावाकडे परत येत होते. दरम्यान, विठोबा वासेकर यांच्या शेतात शेततळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ ते पोहोचले. मात्र, अचानक मुन्नाचे संतुलन बिघडल्याने तो पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. मुन्नाला वाचविण्यासाठी किसनने खड्ड्यात उडी मारली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दुपारपर्यंत दोघेही घरी परत आले नाहीत, म्हणून त्यांना शोधण्यासाठी त्यांचे कुटुंब विटभट्टीकडे निघाले. दरम्यान, कुटुंबीयांना शेतातील खड्ड्याजवळ त्यांची सायकल आढळून आली. कुटुंबीयांना संशय येताच, त्यांनी खड्ड्यातील पाण्यात शोध घेतला. यावेळी दोघांचेही मृतदेह खड्ड्यातील पाण्यात आढळून आले. घटनेची माहिती गावात पोहोचताच बोदली व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या साहाय्याने दोन्ही भावांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details